आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना, कश्यप उपांत्यपूर्व फेरीत; फ्रान्सच्या विग्नेस वरनचा पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बासेल- भारताची युवा खेळाडू सिंधूपाठोपाठ सायना नेहवाल आणि पी.कश्यपने स्विस ओपन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आता सायनाचा सामना चीनच्या अव्वल मानांकित यिहान वांगशी होईल.

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत फ्रान्सच्या विग्नेस वरनला सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. तिने लढतीत 21-7, 21-13 अशा फरकाने विजय मिळवला. याशिवाय भारताच्या खेळाडूने अवघ्या 34 मिनिटांत अंतिम आठमधील स्थान निश्चित केले. तिने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये सहज विजय मिळवला. तिने फ्रान्सच्या खेळाडूला प्रत्युत्तराची फारसी संधी मिळू न देता 21-7 ने बाजी मारली. त्यानंतर तिने आपल्या आक्रमक खेळीची लय कायम ठेवताना दुसर्‍या गेममध्येही बाजी मारली. तिने 21-13 असे यश संपादन केले. याशिवाय सायनाने फ्रान्सच्या खेळाडूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता सायनासमोर अव्वल मानांकित यिहान वांगचे तगडे आव्हान असेल.

गत आठवड्यात तिला ऑल इंग्लंड ओपनमध्येही निराशाजनक कामगिरीमुळे बाहेर पडावे लागले. यासह तिचे सत्रातील पहिल्या किताबाचे स्वप्न भंगले.

कश्यपची एकेरीत विजयी हॅट्ट्रिक
जागतिक क्रमवारीत 25 व्या स्थानी असलेल्या पी. कश्यपने स्पर्धेत विजयी हॅटट्रिक नोंदवली. त्याने पुरुष एकेरीच्या तीन सामन्यांत सलग विजयाची नोंद केली. त्याने तिसर्‍या फेरीत मलेशियाच्या वोंग बेरिनो जियानला पराभूत केले. भारताच्या कश्यपने 21 -13, 21-9, 21-14 अशा फरकाने विजय मिळवला. यासाठी त्याला तब्बल 54 मिनिटे शर्थीची झुंज द्यावी लागली. आता त्याचा सामना आठव्या मानांकित तिएन चेन चाऊशी होईल.

जॉर्गेसनची आगेकूच
पुरुष एकेरीतील अव्वल मानांकित जे. जॉर्गेसननेही स्पर्धेतील विजयी मोहिम अबाधित ठेवली. त्याने जर्मनीच्या डी. डोम्केचा पराभव केला. त्याने 21-19, 19-21, 21-11 ने सामना जिंकला. यासाठी त्याला शर्थीची झुंज द्यावी लागली.