आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina, Kashyap Win Syed Modi International Badminton Championship

सायना, पी. कश्यप चॅम्पियन, कॅरोलिना मारिन उपविजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - सायना नेहवालने सलग दुसऱ्यांदा सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. पुरुष गटात परुपल्ली कश्यपने अव्वल मानांकित श्रीकांतचा पराभव करत चॅम्पियन बनला. श्रीकांतला सलग दुसऱ्यांदा अंतिम लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. अव्वल मानांकित सायनाने दुसऱ्या मानांकित कॅरोलिना मारिनला १ तास १९ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत मात दिली. पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये कश्यपने निर्णायक क्षणी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतला हरवले. कश्यपने सरळ दोन सेटमध्ये हा विजय मिळवला.
सायनाने मारिनला १९-२१, २५-२३, २१-१६ ने हरवले, पी. कश्यपने श्रीकांतला २३-२१, २३-२१ ने नमवले.