वर्ल्‍ड चॅम्पियनशिप बॅडमिंटनः / वर्ल्‍ड चॅम्पियनशिप बॅडमिंटनः सायनाचा दारुण पराभव

वृत्तसंस्था

Aug 13,2011 03:50:54 AM IST

लंडन-लंडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अटीतटीच्या लढतीत 6 व्या मानांकित भारताच्या सायना नेहवालला पराभवाचा धक्का बसला. चीनच्या वांगने शर्थीच्या लढतीत अवघ्या 30 मिनिटांत कलाटणी देणारी खेळी करत 21-15, 21-10 गुणांच्या आघाडीने सायनाला पराभवाची धूळ चारली. या पराभवामुळे महिला एकेरीतील विजेतेपदाचे सायनाचे स्वप्न भंगले.
वल्र्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत सायनाची तिसर्‍या मानांकित वांग हिच्याशी लढत झाली. आव्हान राखून ठेवण्यासाठी आक्रमक खेळीच्या प्रयत्नात असलेल्या सायनाला वांगने पहिल्या सेटवर 21-15 गुणांनी धक्का देत आघाडीची खेळी केली. सायनाने कोर्टवर ताबा मिळवला. मात्र वांगने चोख खेळी करत 21-10 ने बाजी मारली.

पराभवाचा अनपेक्षित धक्का!
विजेतेपदाचे आव्हान राखून सायनाने ठेवण्यासाठी पूरक अशा शानदार खेळीचे प्रदर्शन केले. मात्र वांगच्या आक्रमक खेळीचा सामना करताना रचलेले डावपेच पूर्णत: उधळले गेले. त्यामुळे पहिला सेट गमवावा लागला. मात्र दुसर्‍या सेटवरच्या खेळीत चुका सुधारून खेळी केली. तरीही दुसरा सेट गमावल्याचे दु:ख आहे. माझ्या परीने योग्य अशी प्रत्युत्तराची खेळी केली. मात्र तरीही अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.
सायना नेहवाल

X
COMMENT