आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Make Practice For The Super Series After IBL

आयबीएलनंतर सायनाची सुपर सिरीजसाठी तयारी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये केलेल्या स्वप्नवत कामगिरीनंतर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल लवकरच होणा-या सुपर सिरीजसह पुढील वर्षी होणा-या राष्‍ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेच्या तयारीला लागली आहे.


सध्या माझे लक्ष येत्या सुपर सिरीजवर केंद्रित झाले आहे. पुढील वर्षी राष्‍ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा होणार असल्याने पुढील वर्षदेखील प्रचंड महत्त्वाचे असल्याचे सायनाने नमूद केले. त्या सर्व स्पर्धांसाठी मी तंदुरुस्त असेन, असा विश्वास असल्याचे सायनाने नमूद केले. 17 ते 22 सप्टेंबरला जपानमध्ये होणा-या जपान सुपर सिरीजच्या पार्श्वभूमीवर ती बोलत होती. आयबीएलमध्ये अपराजित राहिल्याने आनंदित असलेल्या सायनाने आयबीएलचा फायदा नवीन उद्योन्मुख खेळाडूंसह जुन्या खेळाडूंनाही झाल्याचे सांगितले. विश्वातील सर्वोत्तम खेळाडूंबरोबर खेळण्याचा फायदा नजीकच्या काळात दिसेल. या अनुभवाचा आता प्रत्यक्ष खेळात फायदा होईल, असे सायनाने नमूद केले.


ऑलिम्पिकपर्यंत तंदुरुस्तीचा विश्वास
रिओ ऑलिम्पिक होण्यासाठी अद्याप प्रदीर्घ काळ असला तरी तोपर्यंत मी नक्कीच तंदुरुस्त असेन. ऑलिम्पिकमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करणे हे ध्येय असल्याने त्या काळात मी अधिकाधिक मोकळा आणि आत्मविश्वासाने खेळ करण्याचा प्रयत्न करेन.


टॉप टेनमध्ये राहू..
बहुतांश भारतीय खेळाडूंनी आयबीएलमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. त्यात विशेषत: सिंधू आणि श्रीकांतची कामगिरी खरोखरच चांगली होती. त्यामुळे नजीकच्या भविष्यात भारतीय बॅडमिंटनपटू सर्व प्रकारातील पहिल्या दहांमध्ये दिसू शकतील, असे सायना म्हणाली.