आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal And Arundhati Pantavane Win Thailand Gropy Gold Badminton

थायलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सायना, अरुंधती विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक- जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेली सायना नेहवाल आणि नवोदित खेळाडू अरुंधती पानतावणेने बुधवारी थायलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. या दोघांनी महिला एकेरीचे सामने जिंकून स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली.

अव्वल मानांकित सायना नेहवालने महिला एकेरीत सिन्ह हान हुंगवर मात केली. तिने अवघ्या 29 मिनिटांत 21-12, 21-16 अशा फरकाने सामना जिंकला. हैदराबादच्या 23 वर्षीय खेळाडूचा सामना आता इंडोनेशियाच्या फेबी अंग्गुनीसोबत होणार आहे.

तसेच नागपूरच्या अरुंधतीने कोरियाच्या मिन जी लीला धूळ चारली. तिने या रोमांचक लढतीत 14-21, 21-9, 21-15 ने विजय मिळवला. तिने 45
मिनिटांत सामना जिंकून आगेकूच केली. आता तिच्यासमोर पाचव्या मानांकित सास्पिरी व इंडोनेशियाची येनी अस्मारनी यांच्यातील विजेत्या खेळाडूचे आव्हान असेल.

पुरुष गटात साई प्रणीत, पाचवा मानांकित अजय जयराम, एच.ए.प्रणय, आठवा मानांकित सौरभ वर्मा व 13 व्या मानांकित के. श्रीकांतने यशस्वीपणे दुसर्‍या फेरीत धडक मारली. प्रणीतने आॅल इंग्लंड चॅम्पियन मोहंमद हाफिज हाशिमला 21-12, 9-21, 22-20 ने पराभूत केले. त्याने अवघ्या 47 मिनिटांत विजय मिळवून दुसर्‍या फेरीत धडक मारली. जयरामने इंडोनेशियाच्या सेसार हिरेनवर 21-11, 19-21, 21-9 असा विजय मिळवला. आनंद पवारने इंडोनेशियाच्या रियांतो सुबागजाला 21-15, 9-21, 21-14 ने हरवले. सौरभने खोसिट फेटप्राडाबचा 21-16, 21-18 ने पराभव केला.
के.श्रीकांतने कोरियाच्या ह्युक जिन जोनवर 21-17, 21-12 ने मात केली.

तुलसीकडून निराशा
पी.सी. तुलसीला मात्र स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिसर्‍या मानांकित पोर्नटिप बुरांगप्रसेर्टस्कने भारताच्या खेळाडूवर 21-14, 21-17 ने विजय मिळवला.