आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Bows Out Of Malaysia Open Badminton

सायनाचा पराभव, चीनच्या जुई रुईचा संर्घषपूर्ण विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - अधिकृतरीत्या जगातली नंबर वन खेळाडू बनल्याच्या दोन दिवसांतच सायनाने नंबर वनचा ताज गमावला. पाच लक्ष डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या ली जुई रुईने सेमीफायनलमध्ये सायनाला २१-१३, १७-२१, २०-२२ ने हरवले. सायनाने सामन्यात जोरदार संघर्ष केला.
मात्र, तिसऱ्या गेममध्ये २०-२० अशा बरोबरीनंतर तिचा पराभव झाला. तिसरी मानांकित सायनाने हा संघर्षपूर्ण सामना एक तास आणि ८ मिनिटांत गमावला. या पराभवासह सायनाने ऑलिम्पिक विजेता आणि अव्वल मानांकित जुई रुईविरुद्ध ११ सामन्यांत नववी लढत गमावली. सायनाने अखेरीस जुई रुईला २०१३ च्या इंडोनेशिया ओपनमध्ये हरवले होते. क्वार्टर फायनलमध्ये सायनाने जगतीक क्रमवारीतील १५ वी खेळाडू चीनच्या सुन यू हिला २१ -११, १८-२१, २१-१७ ने पराभूत केले होते.