आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal In China Open Super Series Semi Final's

चीन आेपन सुपर सिरीज प्रीमियर, सायना नेहवाल उपांत्य फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुजाेऊ - आॅस्ट्रेलियन चॅम्पियन सायना नेहवालने शुक्रवारी चीन आेपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत यजमान चीनच्या सुआे डीला पराभूत केले. भारताच्या खेळाडूने २१-१३, १७-२१, २१-५ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने अंतिम चारमधील आपले स्थान निश्चित केले.

सहाव्या मानांकित सायनाने तब्बल ६० मिनिटे शर्थीची झंुज देताना सामना उपांत्यपूर्व सामना आपल्या नावे केला. पहिल्या गेममध्ये सहज विजय मिळवून सायनाने लढतीत आघाडी मिळवली. यासह तिने दमदार सुरुवात केली. दरम्यान, सुआे डीने घरच्या मैदानावर सायनाला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पहिल्या गेममध्ये सपशेल अपयशी ठरली.

दुस-या गेममध्ये चीनच्या खेळाडूने दमदार पुनरागमन केले. तिने दुस-या गेममध्ये चाेख प्रत्युत्तराची खेळी करताना २१-१७ ने बाजी मारली.