आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन आेपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन, सायना, श्रीकांत फायनलमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुझाेऊ - आॅस्ट्रेलियन चॅम्पियन सायना नेहवाल आणि श्रीकांतने शनिवारी चीन आेपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सहाव्या मानांकित सायनाने अवघ्या ४८ मिनिटांत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. तिने यजमान संघाच्या लुई झिनला सरळ दाेन गेममध्ये धूळ चारली. तिने २१-१७, २१-१७ अशा फरकाने उपांत्य सामना जिंकला.
येआेनचा पराभव : पाचव्या मानांकित बाई येआेनला सरळ दाेन गेममध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. तिला बिगरमानांकित अकाने यामाक्युचीने धूळ चारली. चीनच्या या खेळाडूने २१-१०, २५-२३ ने सामना जिंकला.
मार्कची माघार; श्रीकांत विजयी
जर्मनीच्या मार्क झिइब्लेरने दुखापतीमुळे पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यातून माघार
घेतली. या वेळी भारताच्या श्रीकांतने २१-११ ने पहिल्या गेममध्ये बाजी मारून दुस-या गेममध्ये १३-७ ने आघाडी मिळवली हाेती. दरम्यान, मार्कने दुखापतीमुळे खेळण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीकांतला विजयी घाेषित करण्यात आले. आता त्याचा सामना चीनच्या ली डानशी हाेईल.
सायना-यामाक्युची फायनल महिला एकेरीच्या किताबासाठी सायना नेहवाल आणि बिगरमानांकित अकाने यामाक्युची यांच्यात फायनल रंगणार अाहे. सलग विजयाची नाेंद करताना सायना नेहवालने अंतिम फेरीत धडक मारली.