आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षाचा सायनाचा 'हा' आहे संकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नव्या वर्षात फिटनेसवर अधिक लक्ष देणार. गरज पडल्यास काही मोठ्या स्पर्धेतून माघार घेणार असल्याचे संकेत लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने दिले. मुंबई येथे महिला गोल्फ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात सायना सहभागी झाली होती. ‘नव्या वर्षात पराभवाची मालिका खंडित करण्यावर माझा अधिक भर असेल. फिटनेससह कामगिरीचा दर्जा उंचावण्यसाठी विशेष मेहनत घेणार आहे. खेळात सकारात्मक निकालासाठी मी पूर्ण फिट असणे गरजेचे आहे. तंदुरुस्तीचा खेळावर परिणाम होतो,’असेही सायना म्हणाली.