आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हालचालीत वेग गरजेचा - सायना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोर्टवर खेळताना आपल्या हालचालीत वेग आणावा लागेल, असे सध्या फॉर्मात नसलेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला वाटते. सायना नेहवालला यावर्षी अद्याप एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. सायना नेहवाल यावर्षी इंडोनेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये आणि थायलंड व सिंगापूर ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. याशिवाय सुदीरमन चषकातून तिने दुखापतीमुळे माघार घेतली. आता ती विश्व चॅम्पियनशिपच्या तयारीत व्यग्र आहे. ‘यावर्षी मी दुखापतींनी खूप अडचणीत आले. माझ्या गुडघ्यात खूप वेदना आहेत. असे असताना सुद्धा मी तीन स्पर्धांत खेळले. या स्पर्धांत खेळताना माझ्या लक्षात आले की कोर्टवर माझ्या हालचाली हळूवार होत होत्या. आता मला यावर लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी सहा आठवड्यांचा सराव पुरेसा आहे, असे मला वाटते,’ असे सायनाने सांगितले.