आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal, Kidambi Srikanth Win China Open Titles

चीन ओपन बॅडमिंटन: सायना महिला तर श्रीकांत पुरुष एकेरीचा विजेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुजोह- जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेली सायना नेहवाल आणि युवा खेळाडू के. श्रीकांत चीन ओपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन ठरले. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने रविवारी महिला एकेरीचा किताब पटकावला. श्रीकांतने पुरुष एकेरीचे अजिंक्यपद आपल्या नावे केले.

ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायनाचे यंदाच्या सत्रातले हे तिसरे विजेतेपद ठरले. तिने सत्रात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रांप्री, ऑस्ट्रेलियन ओपनपाठोपाठ आता चीन ओपनचा चषक आपल्या नावे केला. शिवाय तिने आपल्या करिअरमध्ये एकूण आठव्या प्रीमियर किताबावर नाव कोरले. भारताच्या सायना नेहवालने सहाव्यांदा प्रतिष्ठित चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत गाठली होती.

सायनाची आघाडी कायम
सायनानेदमदार सुरुवात करताना ३-१ ने आघाडी मिळवली. त्यानंतर तिने सरस खेळी करत आघाडीला ८-४ ने मजबूत केले. दरम्यान, अकेनीने केलेल्या निराशाजनक खेळीचा फायदा घेत सायनाने १४-७ अशा फरकाने मोठी आघाडी घेतली. त्यानंतर अकेनीने पुनरागमनाचा प्रयत्न करताना १२ गुणांपर्यंत मजल मारली. मात्र, सायनाने २१-१२ ने पहिल्या गेममध्ये बाजी मारून आघाडी घेतली.

अकेनीची झुंज व्यर्थ
चीनच्या १७ वर्षीय अकेनी यामाक्युचीने दुसऱ्या गेममध्ये बाजी मारण्यासाठी घरच्या मैदानावर शर्थीची झुंज दिली. मात्र, सायनाच्या सरस खेळीमुळे तिने दिलेला लढा व्यर्थ ठरला. अकेनीने १४-१४ ने बरोबरी साधत सायनाला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, त्यानंतर सायनाने १८-१६ ने आघाडी मिळवली होती. मात्र, पुन्हा अकेनीने १८-१८ ने बरोबरी मिळवली. सायनाने दोन गुण अकेनीने एका गुणाची कमाई केली. अकेनीने एका गुणांसह २०-२० ने बरोबरी साधली. मात्र, त्यानंतर सायनाने दाेन गुणांची कमाई करताना दुसरा गेम २२-२० ने आपल्या नावे केला.

सायनाने ४२ मिनिटांत जिंकला अंतिम सामना
भारताचीस्टार खेळाडू सायनाने अवघ्या ४२ मिनिटांत महिला एकेरीचा अंतिम सामना जिंकला. तिने अंतिम लढतीत १७ वर्षीय अकेनी यामाक्युचीला घरच्या मैदानावर धूळ चारली. सायनाने २१-१२, २२-२० अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. यासाठी तिला दुसऱ्या गेममध्ये शर्थीची झुंज द्यावी लागली. दरम्यान, दिलेली झुंज अपयशी ठरल्याने चीनच्या युवा खेळाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या वेळी तिने झुंज देत उपस्थितीतांची मने जिंकली.
०८ अजिंक्यपद करिअरमध्ये जिंकले

के. श्रीकांतची ऐतिहासिक कामगिरी
थायलंड ओपन चॅम्पियन के. श्रीकांतने चीन ओपनमध्ये पुरुष एकेरीचा किताब जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने ४६ मिनिटांत पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन लीनला सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. श्रीकांतने २१-१९, २१-१७ अशा फरकाने अंतिम सामन्यात विजय मिळवला. यासह त्याने जेतेपद आपल्या नावे केले. यंदा प्रथमच भारताला चीन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवून दिले. गतवर्षी भारताचा युवा खेळाडू श्रीकांतने थायलंड ओपनचे विजेतेपद जिंकले होते.