आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकशास्त्रानुसार सायना, टिंटूला भाग्य साथ देणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नूर - लंडन ऑलिम्पिकची सुरुवात झाली आहे. भारताचे आशास्थान असलेल्या खेळाडूंनी आगेकूच सुरू केली आहे. त्यात बॅडमिंटनमध्ये प्रमुख दावेदार असलेली सायना नेहवाल आणि अ‍ॅथलीट टिंटू लुका यांनी केलेल्या कसून सरावाबरोबर त्यांचे भाग्यही साथ देणार असल्याचे भाष्य कन्नूर येथील प्रसिद्ध अंकशास्त्री एम. के. दामोदर यांनी केले आहे. ऑलिम्पिकमध्ये हैदराबादची सायना आणि केरळची टिंटू या दोघी अंकशास्त्रानुसार पदकाच्या मुख्य दावेदार ठरल्या आहेत.
सायनाचा जन्म 17 मार्च 1990 रोजी झाला आहे. तिच्यासाठी आठ अंक अत्यंत शुभ आहे. गेल्या वेळी इंडोनेशियन ओपन स्पर्धा तिने 17 जून रोजी जिंकली होती. कारण, 7 आणि 1 जोडले असता बेरीज आठ होते. अंकांच्या आधारे सायना पदकाच्या अत्यंत जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. याच प्रकारे अ‍ॅथलीट टिंटू लुकाचा जन्म 26 तारखेला झाला आहे. त्याची बेरीज आठ होते. अंकशास्त्रानुसार लंडन ऑलिम्पिक या दोन्ही खेळाडूंसाठी भाग्याचा मार्ग उघडत आहे. या दोन्ही खेळाडूंचे प्रशिक्षक गोपीचंद आणि पी. टी. उषा यांच्या अंकशास्त्रानुसारदेखील या खेळाडू पदक पटकावू शकतात.