आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Misses Hat Trick In Swiss Open Badminton Tournament

स्विस ओपन बॅडमिंटन स्‍पर्धेत सायनाचा धक्‍कादायक पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बासेल- भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची स्वि‍स ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्‍यपदाची हॅट्ट्रीक हुकली. भारताच्‍या स्टार खेळाडूला उपांत्य लढतीत धक्‍कादायक पराभवाचा सामना करावा लागला. तिला चीनच्या शिजियान वांगने 21-11, 10-21, 21-9 ने पराभूत केले. सायनाचा हा सलग दुस-यांदा मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य लढतीत पराभव आहे. यापूर्वी, तिचा ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता.

सायनाला या स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आले होते. मात्र, तिला उपांत्य लढतीत चौथ्या मानांकित खेळाडूकडून पराभव पत्कारावा लागला. चीनच्या वांगने पहिल्या गेममध्ये 8-0 ने आघाडी घेतली आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही. तिने हा गेम 21-11 ने जिंकला. दुस-या गेममध्ये सुरुवातीची 10 गुणांची लढत बरोबरीत होती. त्यानंतर सायनाने सलग गुणांची कमाई करत 21-10 ने दुसरा गेम जिंकला. वांगने तिस-या निर्णायक गेममध्ये जबदरस्त सुरुवात केली आणि पाहता पाहता 5-0 ने आघाडी मिळवली. सायना त्यानंतर पुनरागमन करू शकली नाही.