आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal News In Marathi, All England Badmiton Championship

ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत सायना प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने शुक्रवारी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताच्या खेळाडूने तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळवला.
सातव्या मानांकित सायनाने लढतीत अमेरिकेच्या बिवेन झांगला पराभूत केले. तिने 24-22, 18-21, 21-19 ने विजय मिळवला. यासाठी तिला तब्बल 60 मिनिटे झुंज द्यावी लागली. आता सायनाचा सामना चौथ्या मानांकित वान शिशियानशी होईल. चीनच्या वांगने लढतीत आयर्लंडच्या चोले मॅगीला 21-15, 21-12 ने पराभूत केले.


सायना आणि बिवेन यांच्यात प्रथमच सामना रंगला. भारताच्या खेळाडूने पहिल्या गेममध्ये बाजी मारली. मात्र, तिला दुस-या गेममध्ये बिवेनने पराभूत केले. यासह तिने लढतीत बरोबरी साधली.


इंतानोनची लीवर मात
युवा चॅम्पियन रत्नाचोक इंतानोनने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने चीनच्या हान लीविरुद्ध सामन्यात 18-21, 21-14, 21-11 अशा फरकाने विजय मिळवला.


झुरुई लीची आगेकूच
ऑलिम्पिक चॅम्पियन झुरुई लीनेही स्पर्धेतील विजयी मोहीम अबाधित ठेवताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने जपानच्या मिनात्सू मितानीला 14-21, 21-19, 21-15 ने धूळ चारली.


ली चोंग वेई विजयी
पुरुष एकेरीत जगातील नंबर वन ली चोंग वेईने स्पर्धेत आपल्याच देशाच्या चोंग वेई फेंगला पराभूत केले. त्याने 21-6, 21-12 अशा फरकाने सामना जिंकला.