आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal News In Marathi, All England Super Series Badminton

सायनाची नजर ऑल इंग्लंड किताबावर,ऑल इंग्लंड सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - ऑल इंग्लंड सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालची किताबावर नजर असेल. जानेवारीत सत्रातील पहिले विजेतेपद पटकावल्याने तिचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. या उत्साहासह सायना या स्पर्धेत अजिंक्यपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा महिला एकेरीचा पहिल्या फेरीतील सामना स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरशी होईल.


जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सायनाला स्पर्धेच्या महिला एकेरीत सातवे मानांकन मिळाले. तिचा सलामी सामना जिंकून स्पर्धेत दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. दुस-या फेरीत तिचा सामना ज्युलियन शेंकशी होईल.
कश्यप, श्रीकांतला संधी
नॅशनल चॅम्पियन श्रीकांत व कश्यप पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. श्रीकांतसमोर जपानच्या केंटो मोमोटाचे आव्हान असेल. कश्यप व केनीची तागो सलामी सामन्यात झुंजणार आहेत.
सिंधूचा मार्ग खडतर
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सिंधूचा स्पर्धेतील मार्ग फार खडतर आहे. पहिल्या फेरीत तिचा सामना चीनच्या सुन यू शी होणार आहे.