आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal News In Marathi,All England Badminton Championship, Divya Marathi

ऑल इंग्लंड बॅडमिंटन: सायनाचे स्वप्न भंगले; वांग उपांत्य फेरीत दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सायना नेहवालला शनिवारी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून पॅकअप करावे लागले. उपांत्यपूर्व फेरीत सरळ दोन गेममध्ये चीनच्या शिजियान वांगने सायनाला दो गेममध्ये सहजपणे पराभूत केले. यासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.


चौथ्या मानांकित शिजियान वांगने एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सायनाला 21-17, 21-10 अशा फरकाने धूळ चारली. यासह तिने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. निराशाजनक कामगिरीमुळे सायनाचे 43 मिनिटांत अंतिम चारमधील प्रवेशाचे स्वप्न भंगले. जागतिक क्रमवारीतील दहावी आणि भारताची दुसरी खेळाडू पी.व्ही.सिंधूचा पहिल्या सामन्यातच पराभव झाला होता.


वांग-यिहान उपांत्य लढत : लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला नमवून शिजियान वांगने उपांत्य फेरी गाठली. आता तिचा उपांत्य सामना दुस-या मानांकित यिहान वांगशी होईल. यिहानने उपांत्यपूर्व लढतीत कोरियाच्या याने जू बेईला पराभूत केले. तिने 21-8, 21-13 अशा फरकाने सामना आपल्या नावे केला. यासह तिने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला.