आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मभूषणसाठी सायना नेहवालच्या नावाची शिफारस, ४८ तासांत मिळाला न्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालला ४८ तासांत न्याय मिळाला. या वेळी दिलेल्या लढ्यामुळे आता क्रीडा मंत्रालयाने पद्मभूषण पुरस्कारासाठी सायना नेहवालच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे आता या पुरस्कारासाठी तिच्या नावाचाही विचार केला जाणार आहे. मंत्रालयाने तिचे नाव गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. यापूर्वी क्रीडा मंत्रालयाने या पुरस्कारासाठी दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू सुशीलकुमारच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र, अद्याप हा पुरस्कार सायनाला मिळेल की नाही, हे निश्चित झालेले नाही.

बॅडमिंटन या खेळात सायना नेहवालने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे पद्मभूषण पुरस्कारासाठी तिच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाने केली. यासाठी स्पेशल केस तयार करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची १५ डिसेंबरपर्यंत मुदत होती, असेही या वेळी क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले.