आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक क्रमवारीत सायना नेहवाल सातव्या स्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा केली. तिने क्रमवारीत सातवे स्थान गाठले. नुकतेच सय्यद मोदी आंतरराष्‍ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने महिला एकेरीचा किताब पटकावला.


तब्बल 15 महिन्यांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका खंडित करताना सायनाने यंदा सत्रातील पहिले विजेतेपद आपल्या नावे केले. या अजिंक्यपदाचा तिला क्रमवारीत मोठा फायदा झाला. तिने दोन स्थानांनी प्रगती साधली. गत तीन दिवसांपूर्वी तिची नवव्या स्थानी घसरण झाली होती.


पुरुष एकेरीत के. श्रीकांतने अव्वल-20 मध्ये धडक मारली. लखनऊ येथे झालेल्या स्पर्धेत त्याने उपविजेतेपद पटकावले. तो विसाव्या स्थानी विराजमान झाला. पी. कश्यप 18 व्या स्थानी कायम आहे. दुसरीकडे अजय जयरामची 22 व्या स्थानी घसरण झाली. त्याचे क्रमवारीत एका स्थानाने नुकसान झाले, तर गुरुसाईदत्तने 28 वे स्थान गाठले. त्याने एका स्थानाने क्रमवारीत सुधारणा केली.


सिंधूची प्रगती
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने अव्वल दहामध्ये प्रवेश केला. तिने दहावे स्थान गाठले. सय्यद मोदी आंतरराष्‍ट्रीय ग्रांप्री स्पर्धेतील उपविजेतेपदाचा तिलाही फायदा झाला. यापूर्वी सिंधू 11 व्या स्थानी होती.