आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal, P.Kashyap Reached Semifinal In Syad Modi International Badminton

सायना नेहवाल, पी. कश्यप सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असलेली सायना नेहवाल अणि तिस-या मानांकित पी. कश्यपने शुक्रवारी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित सायना नेहवालने नागपूरची युवा खेळाडू अरुंधतीला पराभूत केले.

सहाव्या मानांकित पोर्नटिप बुरानाप्रात्सेतुकने भारताच्या तुलसीचा पराभव केला. तिने २१-१६, २०-२२, २१-१२ ने विजय मिळवला.

कश्यपचा सहज विजय : भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सहज विजय मिळवला. त्याने सामन्यात दहाव्या मानांकित झी लियांग डॅरेक वोंगला धूळ चारली. त्याने २१-१८, २१-९ अशा फरकाने सामना आपल्या नावे केला. आर. एम. व्ही. गुरुसाईदत्तने दिलेली झुंज अपयशी ठरली. त्याला चौथ्या मानांकित एच. एस. प्रणयने पराभूत केले. त्याने २१-१८, २१-१९ ने सामना जिंकला.