आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना, सिंधूचा पराभव, बॅडमिंटन अाशिया : जेतेपदाचे स्वप्न भंगले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान - जगातील नंबर वन सायना नेहवाल व सिंधूचे शुक्रवारी बॅडमिंटन अाशिया चॅम्पियनशिपमधील अाव्हान संपुष्टात अाले. यासह भारतीय खेळाडुंचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. दाेन दिवसांपूर्वीच राष्ट्रकुल चॅम्पियन पी. कश्यपही तिसऱ्या फेरीतील पराभवासह अाशिया स्पर्धेतून बाहेर पडला अाहे.

सिंधूचा ५२ मिनिटांत पराभव
जागतिक स्पर्धेतील दाेन वेळच्या कांस्यपदक विजेत्या सिंधूचे आव्हान अवघ्या ५२ मिनिटांमध्ये संपुष्टात अाले. तिला अाॅलिम्पिक चॅम्पियन झुईरुईने पराभूत केले. झुईरुईने ११-२१, २१-१९, २१-८ ने विजय मिळवला.

यिंगचा विजय
जू यिंगने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सायनाविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने शर्थीची झंुज देत १६-२१, २१-१३, २१-१८ ने सामना जिंकला. यासाठी सायनाने दिलेली ५५ मिनिटांची झुंुज अपयशी ठरली.