आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंड ओपनसाठी सायना सज्ज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - येथे सुरू होत असलेल्या थायलंड ओपनसाठी भारताची अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सज्ज झाली आहे. शनिवारी सायना बँकॉकमध्ये मध्यरात्री दाखल झाली. येत्या 5 जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 10 जून रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सायनाला यंदाच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. इंडियन ग्रांप्री स्पर्धेतील अपयशातून सावरत नव्या उमेदीने आपण स्पर्धेत खेळणार असल्याचे सायनाने स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत तिला अव्वल स्थान मिळाले आहे. ‘गत स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीतून सायना आता पूर्णपणे सावरली आहे. सरावामुळे तिच्या कामगिरीचा दर्जा वाढला आहे. तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची आशा पल्लवित केल्या आहे. या स्पर्धेआधी तिचा थायलंड व इंडोनेशिया ओपन अशा दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत कस लागणार आहे. पाच आठवड्यानंतर ती लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. तिचा उत्साहही पदकाची आशा पूर्ण करेल, असा विश्वास प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला.
सायना नेहवालसह या स्पर्धेत पी. व्ही. सिंधू, प्राजक्ता सांवत, गुरूसाई दत्त आपले नशीब आजमावणार आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे पी. कश्यप या स्पर्धेला मुकला आहे. आगामी इंडोनेशिया व सिंगापूर ओपनसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे.