आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतून सायनाची माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या सायना नेहवालने आगामी आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली. उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या तयारीसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती सायनाचे प्रशिक्षक पी.गोपीचंद यांनी दिली. मागील 19 महिन्यांपासून सायनाला कोणत्याही मोठय़ा स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. ही पराभवाची मालिका खंडित करण्यासाठीच तिने विर्शांती घेतल्याचीही चर्चा आहे. गत 2012 मध्ये सायनाने आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. येत्या आठवड्यात कोरियात आशियाई बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत पी. व्ही. सिंधू महिलाच्या एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्यावर सर्वांची नजर असेल. तसेच मेमध्ये उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा नवी दिल्लीत आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल नशीब आजमावणार आहे.