आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Sold At Rs 71 Lakh In Indian Badminton League

IBL : सायना नेहवाल झाली हैदराबादी, अश्विनी पोनप्‍पा खेळणार पुण्‍याकडून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- इंडियन बॅडमिंटन लीगसाठी खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. भारताचे नाव बॅडमिंटन जगतात नेणा-या सायना नेहवालला हैदराबाद टीमने 1,20000 डॉलर्स (71.75 लाख रूपये)मध्‍ये खरेदी केले आहे. तिचे बेस प्राईस ही 50,000 डॉलर्स इतकी होती.

जागतिक क्रमवारीत पहिल्‍या क्रमांकावर असलेल्‍या ली चोंग व्‍हीने भारताची स्‍टार खेळाडू साईनाला लिलावात मागे टाकले. त्‍याला मुंबई टीमने 80.72 लाखांत खरेदी करण्‍यात आले.

भारतीय बॅडमिंटनचे चित्र बदलण्यासाठी प्रयत्नांना वेगाने सुरुवात झाली आहे. इंडियन बॅडमिंटन लीगच्या बोली प्रक्रियेवेळी सहभागी झालेल्यांचा उत्साह बघून असेच म्हणावे लागेल. बॅडमिंटन बोली प्रक्रियेच्या वेळी खालील खेळाडूंना संधी मिळाली.
1. ज्युलियन शँक , जर्मनी: आधार मूल्य : 30 लाख रुपये. खरेदी मूल्य : 62 लाख रु. (पुणे पिस्टन्स)
2. हू यून, हाँगकॉँग : आधार मूल्य : 30 लाख रुपये. खरेदी मूल्य : 30 लाख रु. (बंगा बिट्स)
3. तियेन मिन्ह, व्हिएतनाम : आधार मूल्य : 25.5 लाख रु. खरेदी मूल्य : 25.5 लाख रु. (पुणे पिस्टन्स)
4. तौफिक हिदायत, इंडोनेशिया : आधार मूल्य : जवळपास 9 लाख रु. (हैदराबाद हॉट)


पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून, जाणून घ्‍या या लिलावाचे ताजे अपडे्टस...