आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस ओपन बॅडमिंटन: सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बासेल - गतविजेत्या सायना नेहवालने शुक्रवारी स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने महिला एकेरीत बल्गेरियाच्या पेत्या नेदेलचेवावर 21-15, 21-10 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह तिने अंतिम आठमध्ये स्थान मिळवले.

अव्वल मानांकित सायनाचा हा प्रतिस्पर्धी नेदेलचेवाविरुद्ध सहावा विजय ठरला. यापूर्वी तिला बल्गेरियाच्या खेळाडूकडून दोन वेळा पराभव पत्करावा लागला. आतापर्यंत दोन्ही तुल्यबळ खेळाडूंमध्ये 8 सामने झाले. यामध्ये सायनाने 6-2 अशी आघाडी घेतली आहे. स्पर्धेत आता भारताचे एकमेव आव्हान टिकून आहे. पी.कश्यप, सिंधूसह सर्व भारतीय खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले.

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने 30 मिनिटांमध्ये सामना जिंकला. तिने लढतीत आठ स्मॅश विनर व तीन नेट विनर मारले. या विजयासह तिला स्पर्धेतील आव्हान राखून ठेवता आले. नुकेतच तिने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर धडक मारली आहे.

दुसर्‍या गेममध्ये सहज विजय - दुसर्‍या गेममध्ये जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या सायनापुढे कोणतेही आव्हान नव्हते. तिने यामध्ये सुरुवातीपासून आघाडी घेतली. सलग गुण मिळवत अव्वल मानांकित खेळाडूने दुसरा गेम जिंकला.

आता चीनच्या जू यिंग तेईचे तगडे आव्हान - भारताच्या सायनासमोर आता उपांत्यपूर्व लढतीत सहाव्या मानांकित जू यिंग तेईचे आव्हान असेल. या दोघींमध्ये आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. यापैकी चार लढती सायनाने जिंकल्या.

पहिल्या गेममध्ये केली निराशाजनक खेळी - पहिल्या गेममध्ये सायनाने निराशाजनक खेळी केली. याचा फायदा घेत नेदलचेवाने 12-8 ने आघाडी घेतली होती. मात्र, शानदार पुनरागमन करत सायनाने सलग गुणांची कमाई केली. तिने काही वेळात 12-12 ने बरोबरी मिळवली. त्यानंतर सरस खेळी करत तिने पहिला गेम 21-15 ने जिंकला.