आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal To Lead Indian Challenge At India Open Super Series

इंडिया सुपर सिरीज जिंकण्याचा सायनाला विश्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेली सायना नेहवाल इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेसाठी अधिक उत्सुक आहे. ड्रॉ कठीण असला तरी पूर्णपणे प्रयत्न करून किताब जिंकण्याचा विश्वास तिने व्यक्त केला. इंडिया ओपनमध्ये 18 देशांतील 220 खेळाडू सहभागी होणार आहेत. सिरी फोर्ट कॉम्प्लेक्समध्ये 23 एप्रिलपासून दोन लाख डॉलरचे बक्षीस असलेल्या या स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेची फायनल 28 एप्रिलला होणार आहे.

‘स्पर्धेतील ड्रॉ फारच अवघड आहे आणि यामध्ये विजय मिळवणे सोपे नाही. प्रत्येक स्पर्धा कठीण असते. ही तर सुपर सिरीज स्पर्धा आहे. यामध्ये सर्व अव्वल खेळाडू सहभागी होतील. सर्वोत्कृष्ट कामगिरी करून मी किताब जिंकण्यासाठी तयार आहे,’ असेही लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने या वेळी सांगितले.