आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायनाने पहिल्यांदाच चीन ओपनवर कोरले नाव, 4 कोटी रुपयांच्या बक्षिसांची लयलूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुझोऊ - भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि श्रीकांत किदांबीने चीनमध्ये तिरंगा फडकवला आहे. चीन ओपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर या दोन्ही भारतीयांनी नाव कोरले आहे. सायनाने बिगरमानांकित अकाने यामाक्युचीचा पराभव करत प्रथमच ही स्पर्धा जिंकली आहे. तर श्रीकांतने चीनच्या ली डानला पराभूत केले.

सायनाने स्पर्धेच्या फायनलमध्ये चीनच्या अकाने यामाक्युचीवर 21-12, 22-20 असा विजय मिळवला. सायना याआधी सहा वेळा चीन ओपनमध्ये खेळली होती. मात्र पहिल्यांदाच तिला जेतेपदावर नाव कोरता आले आहे.

सलग मिळवला विजय
ऑस्ट्रेलियन चॅम्पियन सायना नेहवाल आणि श्रीकांतने शनिवारी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सहाव्या मानांकित सायनाने अवघ्या 48 मिनिटांत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. तिने यजमान संघाच्या लुई झिनला सरळ दोन गेममध्ये धूळ चारत 21-17, 21-17 अशा फरकाने उपांत्य सामना जिंकला होता.

अकाने यामाक्युचीने पाचव्या मानांकित येओनचा केला होता पराभव
अंतिम फेरीत सायनाकडून पराभूत झालेल्या अकाने यामाक्युचीने उपांत्य सामन्यात
पाचव्यामानांकित बाई येओनाला सरळ दोन गेममध्ये पराभूत केले होते. चीनच्या या खेळाडूने 21-10, 25-23 ने सामना जिंकला.
श्रीकांत विजयी :
अंतिम सामन्यात श्रीकांत कदिंबीने चीनच्या ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन ली डानशी लढत दिली. श्रीकांतने हा सामना 21-19, 21-17 अशी आघाडी घेत जिंकला.

त्याआधी जर्मनीच्या मार्क झिइब्लेरने दुखापतीमुळे पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यातून माघार घेतली. या वेळी भारताच्या श्रीकांतने 21-11 ने पहिल्या गेममध्ये बाजी मारून दुसऱ्या गेममध्ये 13-7 ने आघाडी मिळवली होती. दरम्यान, मार्कने दुखापतीमुळे खेळण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीकांतला विजयी घोषित करण्यात आले होते.