आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IBL: सायनाची विजयी घोडदौड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये गुरुवारी हैदराबाद हॉटशॉट्स संघाने बलाढ्य मुंबई मास्टर्स संघाला रोमांचक सामन्यात 3-2 ने नमवले. सायना नेहवाल, शेम गोह आणि वाह लीम, तानगोशेक यांच्या बळावर हैदराबादने सामन्यात बाजी मारली. सामन्यातील पहिला आणि अखेरचा पाचवा सामना मुंबईने जिंकला.


पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर दिवसाचा पहिला सामना मुंबईचा ली चोंग वेई आणि हैदराबादच्या अजय जयराम यांच्यात झाला. ली चोंगने हा सामना 21-19, 11-21, 11-5 ने जिंकून मुंबईला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

हैदराबादची बरोबरी
दिवसाचा दुसरा सामना सायना नेहवाल आणि मुंबईच्या पी. सी. तुलसी यांच्यात झाला. सायनाने ही लढत सहजरीत्या अवघ्या 29 मिनिटांत जिंकून हैदराबाद हॉटशॉट्सला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. सायनाने ही लढत 21-7, 21-10 ने जिंकली. हैदराबादच्या विजयात सायना नेहवालचा सिंहाचा वाटा ठरला. सायनाने स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला.

सामना हैदराबादच्या नावे
चौथ्या सामन्यात हैदराबादच्या तानगोशेकने मुंबई मास्टर्सच्या मार्क ज्वेबलरला 21-19, 17-21, 11-6 ने पराभूत केले. चौथ्या सामन्यातील विजयानंतर ही लढत हैदराबादच्या नावे झाली.

अवधची दिल्लीवर मात
अवध वॉरियर्सने गुरुवारी दिल्ली स्मॅशर्सवर 4-1 ने मात केली. अवधच्या सिंधूने दिल्लीच्या अरुंधती पानतावणेला 21-16, 21-17 ने पराभूत केले. अवधच्या के. श्रीकांतने 21-14, 21-19 ने साईप्रणितवर मात केली. दिल्लीच्या किन - तानने अवधच्या किडो-मॅथ्यूज बोईवर 21-16, 21-19 ने मात केली. गुरुसाई दत्तने डॅरेनवर 21-16, 21-20 ने मात केली. किडी-बेर्नडेथने मिश्र दुहेरीत दिल्लीच्या प्राजक्ता-दिजुला 21-20, 21-19 ने हरवले.

नाचून सायनाने केला जल्लोष
तीन सामन्यांनंतर हैदराबादने 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर कोर्टवर उपस्थित असलेल्या सायना नेहवालने नाचून आपला आनंद साजरा केला. सायनाच्या जल्लोषाने स्टेडियमवर उपस्थित असलेल्या सर्व चाहत्यांचे लक्ष वेधले.

हैदराबादची विजयी आघाडी
सायनाच्या विजयानंतर हैदराबाद संघात जणू नवा उत्साह संचारला. दिवसाचा तिसरा सामना पुरुष दुहेरीचा झाला. यात हैदाराबादच्या शेम गोह आणि वाह लीम या जोडीने मुंबईच्या सुमीत रेड्डी आणि मनू अत्री यांना 11-21, 21-16, 11-9 ने पराभूत केले. शेम आणि लीमच्या जोडीने हैदराबादला 2-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.