आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saina Sindhu Inter In Coly Final, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायना, सिंधू विजयी; भारत उपांत्य फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायना नेहवाल आणि जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सिंधूने भारतीय संघाला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. मात्र, पुरुष संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताच्या महिला संघाने उपांत्यपूर्व लढतीत थायलंडचा ३-२ ने पराभव केला. तत्पूर्वी या संघाने सलामी लढतीत मकाऊचा ३-० ने पराभव केला होता. पुरुष गटात दक्षिण कोरियाने भारताचा ३-० ने पराभव केला. सायना नेहवालने अवघ्या ६७ मिनिटांत सामना जिंकून भारताला दमदार सुरुवात करून दिली. तिने महिला एकेरीत थायलंडच्या रत्नाचोक इंतानोनला २१-१५, १७-२१, २१-१८ ने हरवले. मात्र, तुलसीला बुसाननने ३६ मिनिटांत २१-१२, २१-१४ ने पराभूत केले.

३० मिनिटांत सिंधूची पोर्नटिपवर मात
भारताची युवा खेळाडू सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या लढतीत ३० मिनिटांत विजय मिळवला. तिने बुराना पोर्नटिपवर २१-१५, २१-१३ ने मात केली.

५० मिनिटांत दुहेरीत विजय
अश्विनी -सिंधूने महिला दुहेरीत सराली व सपसिरीला ३८ मििनटांत हरवले. भारताच्या जोडीने २१-१६, २१-१७ ने सामना जिंकला.