आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina, Sindhu Progress, Jwala Ashwini Out In France

सायना, सिंधू दुसर्‍या फेरीत; कश्यप पराभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - जगातील चौथ्या क्रमांकाची खेळाडू भारताची सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि अजय जयराम यांनी फ्रेंच ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र, भारताचे इतर दोन खेळाडू पी. कश्यप, एमआरवी गुरुसाई दत्त आणि महिला दुहेरीतील ज्वाला गुट्टा व आश्विनी पोन्नपा यांचा पहिल्याच फेरीत पराभव झाला.

सायनाने थायलंडच्या निचाओन जिंदापोनला 12-21, 21-16, 21-13 ने पराभूत केले. सिंधूने सहावी मानांकित कोरियाच्या सुंग जी हयुनला 21-8, 21-12 ने हरवले. जयरामने मंगळवारी पहिल्या फेरीत जपानच्या काजूमासा सकाईला 38 मिनिटांत 21-16, 21-11 ने पराभूत केले. दुसर्‍या फेरीत त्याचा सामना जगातला नंबर वन खेळाडू मलेशियाच्या ली चोंग वेईशी होईल. त्याने लंडन ऑलिम्पिकचा क्वार्टर फायनलिस्ट पी. कश्यपला 37 मिनिटांत 22-20, 21-12 ने मात दिली. गुरुसाई दत्तला चीनच्या युईकून चेनकडून 9-21, 14-21 ने पराभवाचा सामना करावा लागला.