आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायनाची विंगवर मात; बंगा बीट्स 3-2 ने विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालने घरच्या मैदानावर मंगळवारी आयबीएलमध्ये धडाकेबाज विजय मिळवला. तिने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या ताई जु विंगला 21-17, 14-21, 11-8 ने पराभूत केले. तागोनसेक बुनसाकने बंगा बीट्सच्या पी. कश्यपवर 21-20, 21-18 ने मात केली.
दुसरीकडे कार्लसन मोगेनसेन व अक्षय देवालकरने पुरुष दुहेरीत हैदराबादच्या शेम गोह- किम लीमला 15-21, 21-15, 11-1 ने पराभूत केले. यासह बंगा बीट्सने पहिला विजय मिळवला. जोर्गेसनने एकेरीत हैदराबादच्या जयरामचा 21-11, 21-8 ने पराभव केला. मोगेनसेन-अपर्णाने मिश्र दुहेरीत कोना-प्रज्ञा गद्रेला 21-18, 16-21, 11-9 अशा फरकाने पराभूत केले. यासह बंगा बीट्सने आयबीएलमध्ये हैदराबादला 3-2 ने पराभूत केले.


चायना मास्टर्समधून सायना, सिंधूची माघार
भारताची सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधूने चायना मास्टर्स सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली. येत्या 10 सप्टेंबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. अजय जयराम व आनंद पवार या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. आगामी जपान ओपन सुपर सिरीजमध्ये खेळणार असल्याचे सायनाने सांगितले. ही स्पर्धा 17 ते 22