आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिसपटू साकेतने डेविस कपच्या डिनरदरम्यान गर्लफ्रेंडला केले प्रपोज, पेस साक्षीदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साकेतने डेविस कपच्या डिनरदरम्यान गर्लफ्रेंड श्रीलक्ष्मी एनुमोलुला लग्नासाठी प्रपोज केले. - Divya Marathi
साकेतने डेविस कपच्या डिनरदरम्यान गर्लफ्रेंड श्रीलक्ष्मी एनुमोलुला लग्नासाठी प्रपोज केले.
नवी दिल्ली- 28 वर्षाचा टेनिस प्लेयर साकेत मायनेनीने वर्ल्ड डेविस कपदरम्यानन गर्लफ्रेंड श्रीलक्ष्मी एनुमोलुला लग्नासाठी प्रपोज केले. एनुमोलुने ते मंजूर केले. सर्व काही इतक्या कमी वेळात घडले की सर्वांनाच धक्का बसला. ऑल इंडिया टेनिस एसोसिएशन (एआयटीए)ने लागलीच केक मागवत या क्षणाला यादगार बनवण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित असेलला सात वेळचा ऑलिंपियन लिएंडर पेसने आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहले, "मी प्रथमच अशा प्राकरच्या मॅरेज प्रपोजलचा साक्षीदार बनलो. दोघांना शुभेच्छा." डेविस कपमध्ये लीड करतोय साकेत...
- साकेतने यूएस ओपनमधील मॅन ड्रॉमध्ये क्वालीफाय केल्यानंतर आपल्या करियरमधील एटीपी बेस्ट रॅकिंग 137 मिळवली होती.
- आता तो डेविस कपमध्ये स्पेनविरूद्ध भारतीय टीमला लीड करत आहे.
- साकेतची गर्लफ्रेंड एनुमोलु यूपीएससी सिविल सर्विस एग्जामची तयारी करीत आहे.

कोण आहे साकेत?
- साकेत आंधप्रदेशमधील वुय्युरु येथील रहिवासी आहे. त्याचे लहानपण विशाखापट्टनममध्ये गेले. त्याने 11 व्या वर्षी टेनिस खेळणे सुरु केले.
- साकेतने इंचियोन एशियाई खेल 2014 मध्ये पुरुष डबल्स इवेंटमध्ये सिल्वर आणि मिक्स्ड डबल्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.
- साकेतने सर्बियाच्या पेडजा क्रिस्टीनला 6-3, 6-0 ने फक्त 56 मिनिटांत हारवत यूएस ओपनच्या मेन्स सिंगल्समधील ड्रॉ मध्ये एंट्री मारली होती.
पेसचा जोडीदार होऊ शकतो साकेत-
- आनंद अमृतराज यांनी मंगळवारी संकेत दिले की, साकेत मायनेनी स्पेनविरूद्धच्या डेविस कपच्या प्ले ऑफ डबल्स लढतीत लिएंडर पेसचा जोडीदार होऊ शकतो.
- त्यांनी सांगितले की, यजमान खेळाडूंना या सामन्यात प्वाईंट्स मिळविण्याची मोठी संधी आहे.
- पेसचा जोडीदार रोहन बोपन्नाने गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, लिअंडर पेसने काय केले टि्वट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...