आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅप्टनकुल महेंद्रसिंह धोनी झाला \'बाप\'; म्हणाला, आधी विश्वचषक नंतर मुलीला भेटणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी साक्षीसोबत महेंद्रसिंग धोनी - Divya Marathi
पत्नी साक्षीसोबत महेंद्रसिंग धोनी
गुडगाव - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्याची पत्नी साक्षीने गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात काल (शुक्रवार) दुपारी 2 च्या सुमारास गुटगुटीत मुलीला जन्म दिला. त्यांच्या संसारवेलीवर एक नाजूक फुल उमलले असल्याने साक्षीच्या माहेरी आणि धोनी कुटुंबात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे.
शनिवारी मीडियाशी बोलताना धोनी म्हणाला, की आम्हाला मुलगी झाली आहे. मुलगी आणि आईची प्रकृती ठिक आहे. पण सध्या मी देशाच्या ड्युटीवर आहे. इतर बाबी वाट बघू शकतात. माझ्यासाठी विश्वचषक महत्त्वाचा आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसुतीच्या कळा सुरु झाल्याचे सांगितल्यानंतर साक्षीला सकाळीच फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर तिला लेबर रुममध्ये शिफ्ट करण्यात आले. परंतु, काही अडचणी निर्माण झाल्याने तिला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आले. साक्षीने तेथे एका गुटगुटीत बालीकेला जन्म दिला. यावेळी साक्षीची आई आणि सासू रुग्णालयात उपस्थित होत्या.
मुलीचे वजन दोन किलोच्या जवळपास असून दोघींची प्रकृती चांगली असल्याचे, धोनी कुटुंबातील एका व्यक्तीने सांगितले.
महेंद्रसिंह धोनी सध्या भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. त्याला फोनवरुन मुलगी झाल्याची बातमी देण्यात आली. धोनीला मुलीचा फोटो फोनवर पाठवण्यात आला आहे. सध्याच हा फोटो जाहीर करण्यात आलेला नाही. मुलीचा फोटो मीडियात सध्याच देण्यात येऊ नये, असे धोनी कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
धोनीने बालपणाची मैत्रीण साक्षीशी जुलै 2010 मध्ये लग्न केले होते. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेनंतर धोनी आता 'विश्वचषक-2015'च्या तयारीला लागला आहे. टीम इंडियाची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध 15 फेब्रुवारीला होणार आहे.
साक्षी गरोदर असल्याचे वृत्त गेल्या वर्षी एप्रिल 2014 मध्ये समजले होते. मात्र, धोनीने हे वृत्त फेटाळले होते. नंतर नोव्हेंबर महिन्यात साक्षी गरोदर असल्याचे धोनीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले होते. त्यानंतर मात्र, साक्षी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात तसेच इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दिसली नाही. विवाहानंतर पहिल्यांदाच साक्षी इतके महिने मीडियापासून लांब राहिली.
पुढील स्लाईडसवर क्लिक करून पाहा, महेंद्रसिंह धोनी आणि साक्षीचे काही खास फोटो....