आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदेशी दौ-यावर धोनी ब्रिगेड दुबळी ठरली. आधी दक्षिण आफ्रिका दौरा आणि आता न्यूझीलंडमध्ये तर भारताचा दारुण परभव झाला. भारतीय संघाला एकही डाव जिंकता आला नाही. त्यामुळे मालिका तर गमावलीच शिवाय भारतीयांचा रोषही सहन करावा लागला. क्रिकेटपटू पराभवामुळे हताश दिसत असताना त्यांच्या हौशी बायका मात्र विदेशात पर्यटनाच मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.
एकदिवसीय सामन्यानंतर कसोटीमध्ये भारताकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र, सलामीच्या फलंदाजांनीच घोर निराशा केली. त्यामुळे मधली फळीही अपयशी ठरत आहे.
कर्णधार महेंद्रसिंह धोनीची 'साक्षी', आर.आश्विनची 'प्रीती', चेतेश्वर पुजाराची 'पूजा'आणि उमेश यादवची 'सपना' या सार्या जणी चांगलीच धम्माल करताना दिसत आहेत. सगळ्यांनी स्काय ड्रायव्हिंगचा मनसोक्त आंनद लुटला. विमानातून पॅराशूटद्वारे सर्वप्रथम साक्षीने उडी घेतली. त्यानंतर प्रीतीने उडी घेतली. परंतु सपनाची उडी घ्यायची हिम्मत झाली नाही. त्यांच्या सर्व धाडसी खेळांची छायाचित्रे त्यांनी 'फेसबुक'वर शेअर केली आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि पाहा, क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या करामती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.