आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी ट्विटरवर म्हणाली, माझ्या सुंदर पतीला लग्नाच्या शुभेच्छा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी कॅरिबिअनमध्ये असून हॅमस्ट्रिंग दुखापतीवर उपचार घेत आहे. महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी रावत यांच्या लग्नाचा आज (गुरुवार) तिसरा वाढदिवस. ७ जुलै रोजी धोनीचा वाढदिवस असून या दिवशी तो ३२ वर्षांचा होणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाच्या सदस्यांसोबत थांबल्याने साक्षीला धोनीसोबत लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करता येणार नाहीये.

लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सूक असलेल्या साक्षीने ट्विटरवर लिहिले आहे, की माझ्या सुंदर पतीला लग्नाच्या शुभेच्छा. मला तुझी खूप आठवण येते. आयुष्याच्या या प्रवासात मी तुझ्या बाजूला असल्याचा मला अभिमान आहे.

धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि धोनीचा वाढदिवस जुलै महिन्यात येत असल्याने हा महिना दोघांसाठी काहीसा स्पेशल आहे. यासंदर्भात साक्षीने ट्विटरवर लिहिले होते, की हा स्पेशल जुलै महिना आहे.

धोनीला दुखापत झाली असल्याने तो वेस्ट इंडिजच्या सामन्यांमध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे धोनी लवकरच घरी परतण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने साक्षीच्या आनंदात भर पडली आहे.

छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक