आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Samantha Stosur And Sara Irani Reaches Semifinals Of French Open Tennis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपन: स्टोसूर, सारा उपांत्य फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - दुसरा मानांकित स्पेनचा राफेल नदाल आणि इंग्लंडच्या अ‍ॅँडी मुरे यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. नदालने अर्जेंटिनाच्या जुआन मोनाकोला एकतर्फी लढतीत 6-2, 6-0, 6-0 ने हरवले. इतर एका लढतीत चौथा मानांकित मुरेने 13 वा मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटला संघर्षमय लढतीत 1-6, 6-4, 6-1, 6-2 ने नमवले. दुसरीकडे महिला गटात ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर आणि इटलीच्या सारा इराणी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
उपांत्य फेरीत समंथा स्टोसूर-सारा इराणी समोरासमोर
महिला एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूर आणि इटलीच्या सारा इराणी यांनी दमदार कामगिरी करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी उपांत्य फेरीत दोघेही समोरासमोर असतील. स्टोसूरने सहाव्या मानांकित समंथा स्टोसूरने स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोवाला 6-4, 6-1 ने नमवले. स्टोसूरने दोन्ही सेटमध्ये आक्रमक खेळ करून बाजी मारली. या लढतीत सिबुलकोवा आणि स्टोसूर या दोघींनी प्रत्येकी 2 ऐस मारले. ऑस्ट्रेलियन खेळाडूने 30 विनर्स मारले तर सिबुलकोवाला अवघे 19 विनर्सच मारता आले. स्लोवाकियाच्या खेळाडूला तिच्याच चुका नडल्या. तिने तब्बल 28 साध्या चुका आणि 2 डबल फॉल्ट केले. इतर एका लढतीत 21 वी मानांकित इटलीच्या सारा इराणीने 10 मानांकित जर्मनीच्या अँजोलिक केबरला 6-3, 7-6 ने नमवले. दुस-या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंत चांगलीच झुंज रंगली. हा सेट टायबे्रेकरपर्यंत खेचला गेला. यात इराणीने 7-2 ने बाजी मारली. या सामन्यात केबरने तब्बल 25 तर साराने केवळ 14 चुका केल्या.
नदालचा दमदार विजय
नदालने पूर्ण सामन्यात त्याने मोनाकोला केवळ दोन गेम जिंकू दिले. फ्रेंच ओपनमध्ये 50 सामन्यांत हा त्याचा 49 वा विजय ठरला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना आपल्याच देशाच्या 12 वा मानांकित निकोलस अलमाग्रो याच्याशी होईल. उपांत्यपूर्व फेरीच्या प्रवासापर्यंत नदालने अद्याप एकही सेट गमावलेला नाही. अ‍ॅँडी मुरे आणि फ्रान्सच्या रिचर्ड गास्केट यांच्यात झालेल्या लढतीत पहिला सेट गमावल्यानंतरही मुरेने हार मानली नाही. पुढचे तिन्ही सेट जिंकून त्याने लढत आपल्या नावे केली. या विजयासह तो अंतिम आठमध्ये पोहोचला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना सहावा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररशी होईल.
ली नाच्या पराभवाने चीनचे चाहते निराशेत बुडाले
आशियाची पहिली ग्रँडस्लॅम चॅम्पियन ली नाचा फ्रेंच ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. या पराभवासह चीनचे तमाम चाहते निराशेत बुडाले. चीनची सोशल नेटवर्किंग साइट साइना विबोवर दिवसभर या पराभवाचीच चर्चा होती. ली नाला काय झाले ? असे चाहते विचारत होते. मागच्या वर्षी विजयानंतर तिने आपल्या मातृभूमीचे आभार मानले नाहीत, यामुळे तर असे होत नसेल ना...अशी शंकाही चाहत्यांनी उपस्थित केली. दुसरीकडे पराभवानंतर होणा-या टीकेने ली ना चांगलीच दु:खी झाली. ‘एक सामना गमावल्यानंतर माझ्यावर टीका करणे योग्य नाही. टेनिससुद्धा एक खेळ आहे. कोणत्या कारणांमुळे माझा पराभव झाला, याचा शोध मी घेत आहे,’ असे ली म्हणाली.
ब्रायन बंधू अंतिम चारमध्ये
बॉब व माइक ब्रायन बंधूंनी पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात धडक दिली. त्यांनी उपांत्यपूर्व सामन्यात ऑलिव्हर मरश व होरासियो जबेलोसवर 6-1, 4-6, 6-4 ने विजय मिळवला.
पेस-वेस्निना उपांत्य फेरीत
लिएंडर पेस-एलेना वेस्निना या जोडीने मॅक्स मिर्नेयी व लिएझेल हुबरवर मात करून उपांत्य फेरी गाठली. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत 4-6, 7-5, 10-4 अशा फरकाने विजय मिळवला. एक तास 30 मिनिटात या जोडीने विजयश्री खेचून आणली. उपांत्य फेरीत पेस-वेस्निनाची गाठ पोलंडच्या क्लाउडिया- सॉटिगो गोझालेझशी पडणार आहे.
फ्रेंच ओपन: ली नाचा धक्कादायक पराभव; शारापोवा, सोंगा उपांत्यपूर्व फेरीत