आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanath Jaysurya Appointed As A Chief Selector Of Sri Lanka Cricket

श्रीलंका क्रिकेट निवड समिती प्रमुखपदी सनथ जयसुर्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो- श्रीलंका क्रिकेट मंडळाच्‍या निवड समिती प्रमुखपदी माजी कर्णधार आणि खासदार सनथ जयसुर्याची नेमणूक करण्‍यात आली आहे. जयसुर्याच्‍या अध्‍यक्षतेखाली नव्‍या निवड समितीचे गठनही करण्‍यात आले आहे. श्रीलंकेच्‍या क्रीडा मंत्रालयाने सोमवारी ही घोषणा केली.

जयसुर्याशिवाय या समितीत हेमंत विक्रमारत्‍ने, प्रमोदया विक्रमसिंघे, चमिंडा मेंडिस आणि एरिक उपशांता यांचा समावेश आहे. आधीच्‍या समितीतील विक्रमसिंघे यांचाच नव्‍या निवड समितीत समावेश करण्‍यात आला आहे. विक्रमसिंघे आणि जयसुर्या दोघेही 1996 च्‍या विश्‍वचषक जिंकणा-या संघातील सदस्‍य आहेत. जयसुर्याला या स्‍पर्धेत मालिकावीराचा पुरस्‍कार मिळाला होता.