आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबचा संदीप ठरला सरप्राइज पॅकेज; चार सामन्यांत 9 विकेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सातव्या सत्राच्या आयपीएलमध्ये आता चौकार आणि षटकारांचा तुफानी पाऊस पडत आहे. रोमांचक सामन्यांमुळे आयपीएल आता प्रकाशझोतात येत आहे. मात्र, यात चाहत्यांना भारतीय खेळाडूंची उणीव भासत आहे. कारण भारताचे दिग्गज फलंदाज आतापर्यंत फ्लॉप ठरले आहेत. आतापर्यंत झालेल्या 23 सामन्यांतील कामगिरीमध्ये टॉप-10 मध्ये अवघ्या दोन भारतीय फलंदाजांना स्थान मिळवता आले. दुसरीकडे गोलंदाजीमध्ये मात्र भारताच्या खेळाडूंनी दबदबा कायम ठेवला आहे. गोलंदाजांच्या टॉप-10 मध्ये आठ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांत किंग्ज इलेव्हन पंजाबचा ग्लेन मॅक्सवेल हा सुपरस्टार ठरला आहे. तसेच सरप्राइज पॅकेज म्हणून युवा खेळाडू संदीप शर्माला ओळखले जात आहे.
टॉप-5 भारतीय फलंदाज
खेळाडू संघ सामने धावा
अजिंक्य रहाणे राजस्थान 06 194
मनीष पांडे कोलकाता 06 145
रॉबिन उथप्पा कोलकाता 06 144
अंबाती रायडू मुंबई 04 141
मुरली विजय दिल्ली 06 134
टॉप-5 गोलंदाज
खेळाडू संघ सामने विकेट
मोहित शर्मा चेन्नई 06 11
रवींद्र जडेजा चेन्नई 06 10
संदीप शर्मा पंजाब 04 09
प्रवीण तांबे राजस्थान 06 09
एल.बालाजी पंजाब 06 09