आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sangakara Break Gavaskar And Lara Record, Make 35th Centuries In Career

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगकाराने सुनील गावसकर व ब्रायन लाराचा विक्रम टाकला मागे, कर‍िअरमधील झळकावले 35 वे शतक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चटगाव - पहिल्या डावात त्रिशतक ठोक णा-या कुमार संगकाराला कोणी रोखू शकले नाही. त्याने दुस-या डावातदेखील 105 धावा ठोकल्या. त्याने करिअरमधील हे 35 वे शतक झळकावत सुनील गावसकर आणि ब्रायन लाराचा 34 शतकांच्या विक्रमाला मागे टाकले. संगकारासह दिनेश चंदिमलने (100) नाबाद शतक लगावले. शुक्रवारी श्रीलंकाने दुस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी 4 बाद 305 धावांवर डाव घोषित करत यजमान बांगलादेशसमोर 467 धावांचे अवघड लक्ष्य ठेवले.
श्रीलंकाने पहिल्या डावात 587 धावा काढल्या. बांगलादेशचा पहिला डाव 426 धावांवर संपुष्टात आला. यासह श्रीलंकेला 161 धावांची आघाडी मिळाली. चौथ्या दिवस अखेर बांगलादेशने दुस-या डावात बिनबाद 12 धावा काढल्या. सलामीवीर तमीम इक्बाल नाबाद 7 आणि शमसुर रहेमान नाबाद 4 धावांवर खेळत आहेत. शनिवारी अखेरच्या दिवशी बांगलादेशला आणखी 455 धावांची आवश्यकता आहे.