आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया, लिएंडर पेस, रोहन बोपन्नाची जेतेपदाची लूट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी/ऑकलंड - भारताचा स्टार खेळाडू लिएंडर पेस, रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा यांनी यंदाच्या सत्रातील आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. या तिन्ही अनुभवी खेळाडूंनी संक्रांतीच्या मुहूर्तावर दुहेरीत विजेतेपदाची लूट केली. यासह सानिया, पेस आणि बोपन्नाने सत्रातील पहिली स्पर्धा गाजवली.

सानिया-बेथानी विजयी
आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती सानिया मिर्झा बेथानी माटेक-सँडसोबत अपिया आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. या जोडीने अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अबिगाल स्पेअर्स आणि राक्युइल कोप्स-जॉन्सचा पराभव केला. सानिया-बेथानीने ६-३, ६-३ अशा फरकाने शानदार विजयाची नोंद केली.
6-3 6-3 ने मात
बोपन्ना-नेस्टर सिडनीत चॅम्प
तिस-या मानांकित रोहन बोपन्ना आणि डॅनियल नेस्टरने सिडनी ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. या इंडो-कॅनडियन जोडीने अंतिम सामन्यात दुस-या मानांकित जीन-ज्युलियन रॉजर आणि होरिया टेकाऊचा पराभव केला. तिस-या मानांकित जोडीने ६-४, ७-६ अशा फरकाने सामना जिंकला. यासह बोपन्ना-नेस्टर दुहेरीच्या अजिंक्यपदाचे
मानकरी ठरले. या जोडीला दुस-या सेटमध्ये शर्थीची झुंज द्यावी लागली. दुस-या मानांकित जोडीने दमदार पुनरागमन करताना सामन्यातील दुसरा सेट ट्रायब्रेकरमध्ये खेचला होता. मात्र, सरस खेळी करताना बोपन्ना-नेस्टरने सामना आपल्या नावे केला. यासह रॉजर व रोमानियाचा होरिया टेकाऊला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
६-४, ७-६ ने विजय
पेस-क्लासेनला चषक
भारताच्या लिएंडर पेसने आपला नवा सहकारी दक्षिण आफ्रिकन टेनिसपटू रावेन क्लासेनसोबत हेइनेकेन ओपनचा किताब पटकावला. या चौथ्या मानांकित जोडीने पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये डोमिनिक इंगलोट आणि फ्लोरिन मोर्गाचा ७-६, ६
-४ अशा फरकाने पराभव केला.