आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया-मार्टिनाचा स्टुटगार्ट अाेपन टेनिसमध्ये मार्टिक-स्टेफनीकडून पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टुटगार्ट - महिला दुहेरीच्या जगातील नंबर वन सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगीसला स्टुटगार्ट अाेपन टेनिस स्पर्धेत अनपेक्षित पराभवाला सामाेरे जावे लागले. सलामी सामन्यातील पराभवाने या नंबर वन जाेडीचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.
क्राेएशियाच्या पेट्रा मार्टिक अाणि लिचेटेनस्टेनच्या स्टेफनी वाेग्टने नंबर वन जाेडीवर ६-३, ६-३ ने विजय संपादन केला. यासह सानिया-मार्टिना या जाेडीची विजयी माेहीम खंडित झाली. या वेळी नंबर वन जाेडीला सामन्यातील दाेन्ही सेटमध्ये प्रत्युत्तराची फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे सानिया-मार्टिला सामना गमवावा लागला.
दुसरीकडे बाेपन्ना-फ्लाेरिनला अंतिम अाठमध्ये प्रवेश मिळाला. या जाेडीला पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाली.