आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Advances In Australian Open Women S Doubles

ऑस्‍ट्रेलियन ओपनमध्‍ये सानियाची विजयी घोडदौड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- भारताची स्‍टार टेनिसपटू सानिया मिर्झा ऑस्‍ट्रलियन ओपन स्‍पर्धेत यशस्‍वी घोडदौड करत आहे. प्रत्‍येक दिवशी तिला दोन सामने खेळावे लागत आहेत तरी थोडाही आत्‍मविश्‍वास ढळू न देता ती खेळत आहे.

ऑस्‍ट्रेलियन ओपनच्‍या दु‍हेरी प्रकारात सानियाने अंतिम 16 जोड्यांमध्‍ये स्‍थान पक्‍के केले आहे. झिम्बाब्वेच्‍या कारा ब्‍लॅकसमवेत सानियाने रशियाच्‍या डुशेविना आणि कॅनडाच्‍या युझीन बाउचर्ड यांना सरळ सेटमध्‍ये पराभूत केले. सानियाने 120 मिनिटांमध्‍ये 6-4, 6-3 अशा फरकाने विजय मिळविला.

महिला दु‍हेरीत विजयी घोडदौड करणारी सानिया मिर्झा मिश्र दुहेरीमध्‍ये रोमायिन जोडीदार होरिया टेकाऊच्‍या साथीने खेळत आहे. दुस-या फेरीमध्‍ये तिची लढत ऑस्‍ट्रेलियाच्‍या अनास्‍तासिया रोडियानोवो आणि ब्रिटनच्‍या कॉलिन फ्लेमिंग सोबत असणार आहे.

ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेदरम्‍यानची सानियाचे अधिक छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...