आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियाना मास्टर्स टेनिस स्पर्धा: सानिया-कारा ब्लॅक फायनलमध्ये दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियाना वेल्स- भारताची सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकला सत्रातील पहिला दुहेरीचा किताब जिंकण्याची संधी आहे. जबरदस्त फॉर्मात असलेली ही जोडी इंडियाना मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदापासून अवघ्या एका पावलावर आहे.

पाचव्या मानांकित सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅकने शुक्रवारी महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह या जोडीने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.

सानिया- काराने उपांत्य सामन्यात लुसिई र्हाडेस्का आणि जिई झेंगला पराभूत केले. पाचव्या मानांकित जोडीने 6-4, 3-6, 10-7 अशा फरकाने विजय मिळवला. यासाठी या जोडीला एक तास 37 मिनिटे झुंज द्यावी लागली. आता सानिया-काराचा अंतिम सामना सु वेई-शुई पेंग आणि स्वेतलाना-संमथा स्टोसूर यांच्यातील विजेत्या जोडीशी होईल.

फेडरर-डोल्गोपोलोव उपांत्य सामना : स्विसचा रॉजर फेडरर आणि युक्रेनचा अलेक्सांद्र डोल्गोपोलोव यांच्यात पुरुष एकेरीचा उपांत्य सामना रंगणार आहे. फेडररने नुकतेच उपांत्यपूर्व लढतीत केविन अ‍ॅँडरसनला सरळ दोन सेटमध्ये 7-5, 6-1 ने पराभूत केले. तसेच डोल्गोपोलोवने मिलोस राओनिकवर 6 -3, 6-4 ने विजय मिळवला.

6-4 पहिला सेट
3-6 दुसरा सेट
10-7 तिसरा सेट

97 मिनिटे