आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza And Kara Black Lose Women\'s Doubles In Australian Open

ऑस्‍ट्रेलिया ओपनमधून सानिया आणि कारा महिला दुहेरीत पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)- भारताची स्‍टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार कारा ब्‍लॅक ऑस्‍ट्रलियन ओपन टेनिस स्‍पर्धेत महिला दुहेरीत पराभूत झाली आहे. सारा इरानी आणि राबर्टा विन्‍सी यांनी सानिया आणि कारा या जोडीचा पराभव केला. सानिया आणि काराने पहिला सेट 2-6 असा गमावल्‍यानंतर जोरात पुनरागमन केले. दुसरा सेट 6-3 असा जिंकून सामन्‍यात बरोबरी केली होती. परंतु तिस-या आणि निर्णायक सेटमध्‍ये विजयाची लय सानियाला कायम ठेवता आली नाही. सानियाने तिसरा सेट 4-6 असा गमावला. या पराभवानंतर सानिया आणि काराचे महिला दुहेरीतील आव्‍हानही संपुष्‍टात आले आहे.

2-6, 6-3, 4-6 अशा गुणांनी सानिया आणि कारा पराभूत झाल्या.