आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपनः सानिया-भूपती फायनलमध्ये; फेडरर, नदाल उपांत्‍य फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी सानिया-भूपती यांनी उपांत्य फेरीत गेलिना वोस्कोबोएवा आणि डॅनियल ब्रासियाली यांना 6-3, 6-2 ने नमवले.
भारतीय जोडीने ही लढत एक तास आणि 10 मिनिटांत जिंकली. सातव्या मानांकित भारतीय जोडीने पहिल्यांदा फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने 6-4, 6-2 ने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय जोडीने 3 ऐस मारले. विरोधी खेळाडूंनी एकच ऐस मारला. सानिया-भूपतीने 03 विनर्स आणि 64 गुणांसह फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
जोडीच्या रूपात तिसरे ग्रँडस्लॅम
सानिया आणि महेश भूपती यांनी जोडीने खेळताना तिसºयांदा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीने 2009 मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते. मात्र, 2008 मध्ये येथे या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. भूपतीने आतापर्यंत 11 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यात सात मिश्र दुहेरीचे आहे. भारतीय टेनिस विश्वात सर्वाधिक यशस्वी खेळाडू लियांडर पेस आहे. त्याच्या नावे 13 ग्रँडस्लॅम आहेत.
जोकोविच, फेडरर विजयी
पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात रॉजर फेडररने अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रो याला पराभूत केले. फेडररने पोत्रोला 3-6, 6-7 (4-7), 6-2, 6-0, 6-3 ने नमवले. पहिले दोन सेट गमावल्यानंतर फेडररने दमदार पुनरागमन करून विजय मिळवला. दुसºया एका लढतीत सर्बियाचा नंबर वन नोवाक जोकोविचने संघर्षपूर्ण लढतीत फ्रान्सचा पाचवा मानांकित जो विल्फ्रेड सोंगाला पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत नमवले. जोकोविचने ही लढत 6-1, 7-5, 7-5, 7-6 (8-6), 6-1 ने जिंकली. पहिला सेट जिंकल्यानंतर जोकोविचने पुढचे दोन्ही गमावले. मात्र, चौथा सेट टायब्रेकरवर आणि पाचवा सेट एकतर्फी झुंजीत जिंकून त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. जोकोविचने चिवट खेळ करून उपांत्यपूर्व फेरीत बाजी मारली.

राफेल नदाल उपांत्य फेरीत
स्पेनचा स्टार खेळाडू जागतिक क्रमवारीतील दुसºया क्रमांकाच्या राफेल नदालने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने स्पेनच्याच निकोलस अलमाग्रो याला 7-6 (7-4), 6-2, 6-3 ने नमवले.

शारापोवा, क्वितोवा उपांत्य फेरीत
महिला गटात रशियन सुंदरी मारिया शारापोवाने काईया केनेपी हिला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून उपांत्य फेरीत धडक दिली. दुसरी मानांकित मारियाने 22 वी मानांकित केनेपीला 6-2, 7-3 ने नमवले. दुसºया एका लढतीत चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्वितोवाने कझाकिस्तानच्या येरोस्लोवा शेवेडोवा हिला 6-3, 2-6, 4-6 असे नमवले.

सेमीफायनल लाइनअप
महिला गट : समंथा स्टोसूर, (आॅस्ट्रेलिया) वि. सारा इराणी, (इटली). मारिया शारापोवा (रशिया) वि. पेत्रा क्वितोवा (चेक गण.)
पुरुष गट : जोकोविच (सर्बिया)
वि. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)
राफेल नदाला (स्पेन) वि. अँडी मुरे (इंग्लंड) किंवा डेव्हीड फेरर (स्पेन)