आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियाना वेल्स - भारताची महिला स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची सहकारी कारा ब्लॅक या जोडीला बीएनपी परिबास ओपन महिला टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तैवानची सेई सू वेई आणि चीनची पेंग शुआई या अव्वल मानांकित जोडीने त्यांचा पराभव केला. दीड तासापर्यंत रंगलेल्या या लढतीत वेई-शुआई जोडीने 7-6 (2), 6-2 असा विजय मिळवत स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला. सानिया-कारा जोडीने दमदार सुरुवात करत पहिल्या सेटमध्ये 4-2 ची बढत मिळवली होती. त्यांना 6-5 गुणांवर असताना सेट पॉइंटही मिळाला होता. पण सेई-शुआई जोडीने जबरदस्त पुनरागमन करत हा सेट आपल्या नावे केला. दुसर्या सेटमध्ये इंडो-झिम्बाब्वेईन जोडी फारशी चांगली कामगिरी करू शकली नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या विजयाबरोबरच सेई-शुआई जोडीने स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. सानिया मिर्झाने 2011 मध्ये तिची सहकारी एलिना वेस्निना हिच्यासोबत मिळून या स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.