Home | Sports | Other Sports | sania mirza career on track

करिअरच्या ट्रॅकवर सानिया एक्स्प्रेस सुसाट

वृत्तसंस्था | Update - Aug 07, 2011, 08:38 AM IST

मागील चार वर्षांपासूनच्या हाताच्या गंभीर दुखापतीतून नुकत्याच सावरलेल्या सानिया मिर्झाने या वर्षी आपल्या चमकदार खेळीने मानांकनाच्या ट्रॅकवर चांगलाच वेग घेतला आहे.

 • sania mirza career on track

  कराची - मागील चार वर्षांपासूनच्या हाताच्या गंभीर दुखापतीतून नुकत्याच सावरलेल्या सानिया मिर्झाने या वर्षी आपल्या चमकदार खेळीने मानांकनाच्या ट्रॅकवर चांगलाच वेग घेतला आहे. त्यामुळेच डब्ल्यूटीए किताबाचा बहुमान पटकावून कामगिरी उंचावणारी सानिया सध्या महिला एकेरीत 166व्या तर दुहेरीत 64व्या क्रमांकावर विराजमान आहे. आगामी काळातही कामगिरी उंचावणारी लय कायम ठेवणार असल्याचा विश्वासही तिने या वेळी बोलून दाखवला.

  180 दिवस; 161 लढती
  फ्रेंच ओपनपाठोपाठ विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारण्याची चमकदार कामगिरी करणार्‍या सानियाने अवघ्या 6 महिन्यांत म्हणजे 180 दिवसांत 161 लढती खेळल्या आहेत. एकेरीसह दुहेरीतही विजेतेपदाचा पाठलाग करणार्‍या सानियाने यंदा सर्वाधिक मॅच खेळल्याचे सांगितले.

  कामगिरी उंचावणारे वर्ष!
  वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्या चमकदार खेळीच्या बळावर सानियाने टेनिस कोर्टवर दमदार पुनरागमन केले आहे. हाताच्या दुखापतीतून चांगल्या प्रकारे सावरल्यानंतर सानियाला दमदार खेळीची लय गवसला आहे. याच कामगिरीमुळे यंदाच्या वर्षी सानियाने किताबाकडे अधिकच लक्ष घातले आहे.

  हार में भी है जीत !
  दोन आठवड्यांपूर्वी पती शोएब मलिकसोबतच्या मिनी टेनिस कोर्टवरच्या लढतीतील पराभवातही विजय असल्याची कबुली सानियाने दिली. शोएबविरुद्धची लढत अवघ्या 2 गुणांनी गमावल्यानंतर झालेल्या टीकेमुळे सानिया अधिकच नाराज आहे. मात्र, या पराभवामध्ये विजय असल्याचे तिने स्पष्ट करून टीका करणार्‍यांना चांगलीच चपराक दिली.

Trending