आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Dispels Rumours Of Differences With Husband Shoaib Malik

सानियाच नव्‍हे तर या CELEBS ने पाकिस्‍तानी युवकांशी केले होते लग्‍न!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्‍तानचा क्रिकेटपटू शोए‍ब मलिकसोबत लग्‍न केल्‍या नंतर बरेच तांडव माजले होते. परंतु 'मियॉं बीबी राजी तो क्‍या करेगा काझी' या उक्‍तीप्रमाणे कोणालाही न जुमानता लग्‍न केले. 12 एप्रिल रोजी सानियाच्‍या लग्‍नाचा चौथा वाढदिवस होता.

पाकिस्‍तानी क्रिकेटपटूशी लग्‍न करणारी सानिया पहिली भारतीय नाही. याआधीही अनेक अभिनेत्रींनी पाकिस्‍तानी युवकांशी विवाह केला होता.

कट्टर पारंपरिक प्रति‍स्‍पर्धी असणा-या देशात अशा प्रकारचे लग्‍न काही प्रमाणात यशस्‍वी झाले तर काहींचे रोमान्‍सपुरतेच राहिले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, पाकिस्‍तानी युवकांशी लग्‍न करणा-या भारतीय युवतींविषयी...
-----
रीना रॉय
बॉलिवूडच्‍या टॉप अभिनेत्रीमध्‍ये समावेश होत असलेल्या या अभिनेत्रीने पाकिस्‍तानी क्रिकेटपटू मोहसिन खान सोबत विवाह केला होता. एप्रिल 1983 मध्‍ये ते विवाहबध्‍द झाले होते.
--
अमृता अरोरा
2005- 06 मध्‍ये अमृता अरोराने पाकिस्‍तानी क्रिकेटपटू उस्‍मान अफजल सोबत प्रेमप्रकरण चालले. चार वर्षे चाललेल्‍या या प्रेमप्रकरणाचे 2009 मध्‍ये विवाहात रुपांतर झाले होते.
--
यासीन मलिक
पाकिस्‍तानवासियांशी प्रेम करण्‍यात आपले नेता लोक सुध्‍दा कमी नाहीत. यामध्‍ये काश्मिरचे नेते यासीन मलिकने पाकिस्‍तानच्‍या मिसाल मलिकसोबत लग्‍न केले होते.
--
जीनत अमान
भारताकडून मिस एशिया पॅसिपिक जिंकणारी जीनत अमान आहे. सेक्‍स सिंबल म्‍हणून तिने बॉलिवूडमध्‍ये प्रवेश केला होता. त्‍यामुळे ती खुप चर्चेत होती. पाकिस्‍तानी क्रिकेटचा देव म्‍हणून ओळख्‍ाल्‍या जाणा-या इमरान खानसोबत तिचे अफेअर होते.
--
तवलीन सिंह
भारतामधील सर्वपरिचीत असलेली स्‍तंभलेखिका तसेच राजकीय बातमीदार तवलीन सिंहने सलमान तासीर सोबत लग्‍न केले होते. सलमान तासीर हे पाकिस्‍तानचे एक राजकारणी तसेच उद्योजक होते.