आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Ends Rift With Shoaib Malik Rumours News In Marathi

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक म्‍हणजे,'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सानिया आणि शोएब मलिकच्या संबंधात वितुष्ट आल्याच्या बातम्या गत काही काळापासून माध्यमांमध्ये झळकत आहेत. त्याचदरम्यान सियालकोट या सासरच्या गावी सानिया पोहोचल्यानंतर तिने या सर्व अफवाच असल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम दिल आहे.

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने तिचा नवर्‍याशी कोणताही वाद नसल्याचे सांगत वैवाहिक जीवन संकटात सापडल्याच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसमवेतचे वैवाहिक जीवन सुखी असल्याचेही तिने नमूद केले आहे.

आम्ही दोघेही व्यावसायिक खेळाडू आणि दोन भिन्न देशांमधील आहोत. त्यामुळे व्यावसायिक जीवनात विविध समस्या आणि ताणतणावांचा सामना करावाच लागतो. मात्र, हे सारे माहीत असल्याने आतापर्यंत तरी सारे काही व्यवस्थित चाललेले आहे. असे तिने सांगितले.

सानियाचे निवडक छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...