लंडन - भारताची टेनिसपटू
सानिया मिर्झा सध्या टेनिसच्या ग्रॅड स्लमच्या तयारीसाठी लागली आहे. तत्पूर्वी स्वत:ला थोडे आरामदायी आणि हलके वाटण्यासाठी तिने कुटुंबियांसमवेत मस्ती केली आहे.
ज्यूनिअर विम्बल्डन जिंकलेली सानिया बुधवारी सिनिअर ग्रॅडस्लमची सुरुवात करणार आहे. झिम्बॉब्वेच्या कारा ब्लॅक समवेत ती स्पर्धेत उतरणार आहे.
विम्बल्डनसोबतच फॅमिली हॉलिडे
सानिया यावेळी प्रथमच विम्बल्डनमध्ये परिवारासह दिसली. सानियाने कुंटुंबासमवेतची छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत.
यापूर्वी सानिया प्री-विम्बल्डनमध्ये एगॉन क्लासिकच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झाली होती. लंडनमध्ये झालेल्या स्पर्धेदरम्यान तिने बहीण अनम आणि वडील इम्रान मिर्झासोबत सेल्फी फोटोज घेऊन सोशल साईट्सवर पोस्ट केली होती.
पुढील स्लाइडवर पाहा, सानियाची निवडक छायाचित्रे..