न्यूयॉर्क - भारताचीअव्वल टेनिसपटू
सानिया मिर्झा आणि ब्राझीलचा ब्रुनो सोर्स या जोडीने शानदार कामगिरी करताना अमेरिकन ओपनच्या मिश्र दुहेरीतील फायनलमध्ये धडक िदली. सेमीफायनलमध्ये सानिया -ब्रुनो यांनी चीन-तैपेईची चान यंग जान आणि इंग्लंडचा रॉस हचिन्स या जोडीला तीन सेटमध्ये रंगलेल्या लढतीत ७-५, ४-६, १०-७ ने मात िदली.
मिश्र दुहेरीच्या इतर एका लढतीत सेमीफायनलमध्ये अमेिरकेच्या एबिगाली स्पीयर्स आणि मेक्सिकोच्या सांतियागो गोंजालेज या जोडीने अमेिरकेचे टेलर टाऊनसेंड आणि डोनाल्ड यंग यांना सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ ने पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला.
योकोविक अंतिम चारमध्ये
जागतिकक्रमवारीतील नंबर वन नोवाक योकोविकने २०१२ चा चॅम्पियन इंग्लंडच्या अँडी मरेला पराभूत करून पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. महिला गटात अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने अंतिम चारमध्ये धडक िदली. पुरुष उपांत्यपूर्व फेरीत प्रेक्षकांनी २०१२ यूएस ओपनच्या फायनलसारखा आनंद लुटला. या लढतीत योकोविक-मरे समोरासमोर होते. मागच्या सामन्याच्या तुलनेत या वेळी िचत्र वेगळे होते. योकोविकने मोठमोठ्या रॅलीज खेळून आठवा मानांकित मरेला ७-६, ६-७, ६-२, ६-४ ने पराभूत करून सेमीफायनल प्रवेश केला. हा सामना अत्यंत रंगतदार झाला. अंतिम चारमध्ये योकोविकचा सामना आता जपानच्या केई निशिकोरीशी होईल. िनशिकोरीने ितसरा मानांकित ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाला पाच सेटच्या मॅरेथॉन सामन्यात ३-६, ७-५, ७-६, ६-७, ६-४ ने हरवले. निशिकोरीच्या रूपाने जपानच्या कोणत्याही खेळाडूने तब्बल ९६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
स्पीयर्स-गोंजालेशी सामना
सानियामिर्झा आणि ब्रुनो सोर्स यांचा पुढचा सामना आता अमेरिकेची स्पीयर्स आणि मेक्सिकोचा सांतियागो गोंजालेशी होईल.
शानदार सामना
^आम्हीदोघांनी शानदार सामना खेळला, असे मला वाटते. सामन्याच्या सुरुवातीच्या दोन तासांत आम्हाला खूप घाम गाळावा लागला. आम्ही दोघांनी खूप चुका केल्या. मात्र, सुरुवातीचे दोन सेट महत्त्वपूर्ण ठरले. -नोवाक योकोविक.
(सानिया मिर्झा संग्रहित छायाचित्र)
सेरेना विल्यम्स, माकारोवा सेमीफायनलमध्ये
महिलागटात अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने अापले विजयी अिभयान कायम ठेवताना अकरावी मानांकित इटलीच्या फ्लाविया पेनेटाला सरळ सेटमध्ये ६-३, ६-२ ने पराभूत करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला. महिला एकेरीच्या सामन्यात १७ वी मानांकित रशियाच्या एकातेरिना माकारोवाने १६ वी मानांकित बेलारूसच्या िव्हक्टोिरया अझारेंकाला ८७ मिनिटांत सरळ सेटमध्ये ६-४, ६-२ ने पराभूत केले.